नवी दिल्ली : अर्थमंत्री अरूण जेटली आज केंद्रीय अर्थसंकल्प मांडणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सामान्य माणसाला अच्छे दिन आणण्याची स्वप्नं दाखवली. आता अरूण जेटलींच्या पेटा-यातून आज नक्की काय बाहेर येणार? सामान्य नोकरदार वर्गासाठी काय घोषणा होणार? बजेटनंतर खरोखरच 'अच्छे दिन' येणार का? आदी प्रश्नांची थोड्याच वेळात उत्तर मिळणार आहे.
बहुमतात असलेल्या भाजप सरकारचं पूर्ण बजेट आज सादर होणार आहे. या बजेटमध्ये सर्वसामान्य माणसाला काय मिळण्याची शक्यता आहे.केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल लोकसभेत मांडलाय. आगामी आर्थिक वर्षात आठ टक्के विकासदर अपेक्षित असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय. २०१३ पासून महागाईत सहा टक्क्यांची घट झाल्याचा निष्कर्षही अहवालात नोंदवण्यात आलाय.
सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारकडून जनतेच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मोदी सरकारचा हा पहिलाच पूर्ण अर्थसंकल्प असल्याने अर्थमंत्री जेटलींसमोर जनतेच्या अपेक्षांची पूर्ती करण्याचं आव्हान असेल. महागाई वाढवणाऱ्या यूपीए सरकारला सरकार माफ करणार नाही, असं म्हणत भाजपने यूपीए सरकारवर निशाणा साधला होता. भाजपच्या जाहिरातीवर विश्वास टाकलेल्या जनतेच्या नजरा आता जेटलींच्या अर्थसंकल्पाकडे असतील. त्यामुळे अरुण जेटलींच्या पेटाऱ्यात काय असेल याची उत्सुकता लागली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.