पाच राज्यांचा निवडणुका जाहीर, १९ मेला मतमोजणी

पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुडूचेरी या पाच राज्यांमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.  

Updated: Mar 4, 2016, 04:08 PM IST
पाच राज्यांचा निवडणुका जाहीर, १९ मेला मतमोजणी  title=

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुडूचेरी या पाच राज्यांमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. १९ मेला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी  ७५ ते ८० हजार निमलष्करी जवानांची तैनाती करणार, असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम आणि पुडूचेरी या राज्यातील एकूण ८२४ विधानसभा मतदारसंघात मतदान होणार होणार आहे.  पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत देशातील १७ कोटी नागरीक सहभागी होणार, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली. 

या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून आसाममध्ये १.९८ कोटी मतदार, केरळमध्ये २.५६ कोटी मतदार, तामिऴनाडूत ५.८ कोटी मतदार, पश्चिम बंगालमध्ये ६.५५ कोटी मतदार आणि पुडूचेरीत ९.२७ लाख मतदार आहेत. ते आपला मतदानाचा हक्क बजावतील.

निवडणूक कार्यक्रम :

- आसाममध्ये पाच जूनला मतदान, पश्चिम बंगालमध्ये २२ मे मतदान होणार.
- पुडूचेरीमध्येही एकाच टप्प्यात १६ मे रोजी मतदान होणार
- तामिळनाडूमध्येही एकाच टप्प्यात १६ मे रोजी मतदान होणार.
- केरळमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी १६ मे रोजी एका टप्प्यामध्ये मतदान होणार.
- पश्चिम बंगालमध्ये ५ मे रोजी सहाव्या टप्प्याचे मतदान होणार.
- पश्चिम बंगालमध्ये २५ एप्रिलला चौथ्या टप्प्याचे आणि ३० एप्रिलला पाच टप्प्यांचे मतदान होणार.
- पश्चिम बंगालमध्ये १७ एप्रिलला दुस-या टप्प्याचे, २१ एप्रिलला तिस-या टप्प्याचे मतदान होणार.
- पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी सहा टप्प्यांमध्ये मतदान होणार, पहिल्या टप्प्याचे मतदान दोन तारखांना होणार, चार एप्रिल आणि ११ एप्रिल.
- तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम आणि पुडूचेरीमध्ये आदर्श अचारसंहिता लागू
- आसाममध्ये दोन टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार, पहिल्या टप्प्यामध्ये ६५ जागांसाठी दुस-या टप्प्यामध्ये ६१ जागांसाठी मतदान होणार. ४ एप्रिलला पहिल्या टप्प्याचे, ११ एप्रिलला दुस-या टप्प्याचे मतदान होणार.
 - पाच राज्यांमध्ये पेड न्यूज रोखण्यासाठी निवडणूक आयोगाच्या समितीचे लक्ष असेल.
- प्रत्येक राज्यामध्ये पाच केंद्रीय निरीक्षक निवडणुकीवर लक्ष ठेवतील.
- मतदाराचा गोंधळ होऊ नये यासाठी ईव्हीएम मशीनवर प्रत्येक उमेदवाराचा फोटो असणार.
- मतदारांच्या सुविधेसाठी पाच राज्यांमध्ये मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात येणार  
 - पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी १९ मे रोजी होणार.