सिक्रेट भुयार... पाकिस्तानातून थेट जम्मू काश्मीरमध्ये!

सीमा सुरक्षा दलाला (BSF) एक सिक्रेट भूयार आढळून आलंय. या भूयाराची सुरुवात पाकिस्तानातून होतेय... तर हे भूयार थेट जम्मूतल्या पुरा भागापर्यंत पोहचलंय. 

Updated: Mar 4, 2016, 12:31 PM IST
सिक्रेट भुयार... पाकिस्तानातून थेट जम्मू काश्मीरमध्ये! title=

जम्मू : सीमा सुरक्षा दलाला (BSF) एक सिक्रेट भूयार आढळून आलंय. या भूयाराची सुरुवात पाकिस्तानातून होतेय... तर हे भूयार थेट जम्मूतल्या पुरा भागापर्यंत पोहचलंय. 

जम्मूतल्या निक्की तावी नदिच्या जवळपासच्या भागात हे भूयार आढळून आलंय, अशी माहिती बीएसएफचे अधिकारी राकेश शर्मा यांनी दिलीय. पाहणी करताना पाकिस्तानातून भारतात प्रवेश करणारा एक भूयार आढळून आलंय. जमिनीखालून एका सुरुंगाच्या खोदकाम आणि बांधणी सुरू आल्यानं हा पाकिस्तानचा भारतात दहशतवादी पाठवण्याचा प्रयत्न असल्याचं दिसून येत असल्याचं त्यांनी म्हटलंय. 

उल्लेखनीय म्हणजे, २०१२ सालापासून बीएसएफच्या जवानांनी शोधून काढलेला हा चौथा सुरुंग आहे. त्यामुळे, दहशवादी कारवायांचं जाळ पसरवण्याचे हे प्रयत्न असल्याचं स्पष्ट होतंय. 

हे भूयार जमिनीखाली १० फुटांवर आहे... जवळपास ३० मिटर लांबीचा हा सुरुंग असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय. एखादी व्यक्ती खाली बसून या भूयारातून सहज हालचाली करू शकते. सीमा पोस्ट अल्लाह-माई-दि-कोठी पासून पाकिस्तानच्या अफझल पोस्ट ही व्यक्ती सहज दाखल होऊ शकते, असंही अधिकाऱ्यांनी म्हटलंय.