पहिली 'गतिमान एक्‍सप्रेस' धावणार

सर्वांत पहिली वेगवान रेल्वे ‘गतिमान एक्‍सप्रेस‘ दिल्लीतील हजरत निजामुद्दीन ते आग्रा कॅन्टोन्मेंट या मार्गावर धावणार आहे. ही गतिमान एक्स्प्रेस ५ एप्रिलपासून धावणार आहे. 

Updated: Apr 3, 2016, 11:14 AM IST
पहिली 'गतिमान एक्‍सप्रेस' धावणार title=

नवी दिल्ली : सर्वांत पहिली वेगवान रेल्वे ‘गतिमान एक्‍सप्रेस‘ दिल्लीतील हजरत निजामुद्दीन ते आग्रा कॅन्टोन्मेंट या मार्गावर धावणार आहे. ही गतिमान एक्स्प्रेस ५ एप्रिलपासून धावणार आहे. 

कानपूर-दिल्ली, चंडिगड-दिल्ली, हैदराबाद-चेन्नई, नागपूर-विलासपूर, गोवा-मुंबई आणि नागपूर-सिकंदराबाद या मार्गांवरही 'गतिमान एक्‍सप्रेस' सुरू करण्याचा विचार, रेल्वे मंत्रालयाकडून सुरू आहे.

या रेल्वेत१२ वातानुकुलित डबे असणार आहेत. स्वयंचलित दरवाजे, वाय-फाय अशा सुविधा असणार आहेत. या गाडीचे भाडे 'शताब्दी एक्‍सप्रेस'पेक्षा जास्त असणार आहे.