नवी दिल्ली : दिल्लीतल्या संगम विहार भागातल्या एसबीआयच्या एटीएममधून चिल्ड्रन बँक ऑफ इंडियाच्या दोन हजार रुपयांच्या नोटा मिळाल्या आहेत. कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या रोहित कुमार नावाच्या व्यक्तीला दोन हजार रुपयांच्या या बनावट नोटा मिळाल्या आहेत.
या नोटांवर अधिकृत वॉटरमार्कच्या ऐवजी चूरन लेबल असं लिहिण्यात आलं आहे. या नोटेवर आरबीआयच्या ऐवजी पीके लिहिलं आहे. नोटेच्या डाव्या बाजूला भारतीय मनोरंजन बँक असं लिहिण्यात आलं आहे.
रोहित कुमारनं पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर एक पोलीस अधिकारीही या एटीएममध्ये गेला. या पोलिसालाही अशीच बनावट नोट मिळाली. या प्रकारानंतर पोलिसांनी एटीएमचं सीसीटीव्ही फूटेज बघितलं असून या फूटेजमधल्या व्यक्तीचा शोध सुरु आहे.