भोपाळ-उज्जैन पॅसेंजरमध्ये स्फोट

मध्यप्रदेशमधून एक मोठी बातमी येत आहे. भोपाळमधील जबारीजवळ एका ट्रेनमध्ये स्फोट झाल्याची माहिती येते आहे. ट्रेन भोपाळ येथून उज्जैनला निघाली होती. पोलीस या स्फोटाची चौकशी करत आहेत.

Updated: Mar 7, 2017, 01:00 PM IST
भोपाळ-उज्जैन पॅसेंजरमध्ये स्फोट title=

भोपाळ : मध्यप्रदेशमधून एक मोठी बातमी येत आहे. भोपाळमधील जबारीजवळ एका ट्रेनमध्ये स्फोट झाल्याची माहिती येते आहे. ट्रेन भोपाळ येथून उज्जैनला निघाली होती. पोलीस या स्फोटाची चौकशी करत आहेत.

ट्रेनमध्ये असलेल्या चार्जिंग पॉईंटजवळ हा स्फोट झाल्याचं बोललं जातंय. या कोचला वेगळं करुन ट्रेन रवाना करण्यात आली आहे. या स्फोटात ६ जण जखमी झाल्याची माहिती आहे. हा स्फोट कशामुळे झाला याची चौकशी पोलीस करत आहेत. त्यांच्याकडून अजून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.