मुंबईकरांच्या तोंडाला फुसली पाने

 मोठा गाजावाजा करत दिल्लीत गेलेल्या खासदारांना केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी गाजर दाखविले. मुंबईकर पासधारकांना कोणताही दिलासा नाही. पासच्या दरात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. त्यामुळे पासधारकांनाच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे.14.2 टक्के भाडेवाढ राहणार आहे. ही दरवाढ 28 जूनपासून लागू होणार आहे.

Updated: Jun 24, 2014, 10:20 PM IST
मुंबईकरांच्या तोंडाला फुसली पाने title=

नवी दिल्ली : मोठा गाजावाजा करत दिल्लीत गेलेल्या खासदारांना केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी गाजर दाखविले. मुंबईकर पासधारकांना कोणताही दिलासा नाही. पासच्या दरात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. त्यामुळे पासधारकांनाच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे.14.2 टक्के भाडेवाढ राहणार आहे. ही दरवाढ 28 जूनपासून लागू होणार आहे.

80 किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी थोडासा दिलासा मिळाला आहे. मात्र, 80 किलोमीटरनंतर तिकिट प्रवास महागणार आहे. फस्टआणिसेंकड क्लासच्या पासमध्ये कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. भाडेवाढ कायम ठेवल्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयानं घेतल्य़ाची माहिती मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिका-यांनी दिलीय. त्यामुळं मुंबईकरांना भाडेवाढीपासून कोणताही दिलासा मिळाला नाही. 

फर्स्ट क्लासमधून प्रवास करण-यांना मात्र कोणताही दिलासा मिळालेला नाही. मात्र आधीच पास काढलेल्या फर्स्ट क्लासच्या पासधारकांकडून पंचवीस जूननंतर फरकाची रक्कम वसूल केली जाणार नसल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिलीय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.