नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांच्या एक्झिट पोलने 'आम आदमी पक्षा'ला कौल दिला आहे. काहींनी 'आप'ला स्पष्ट बहुमत दिले आहे. तर काहींनी बहुमताचा आकडा पार करेल, असे म्हटले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा संपल्यात जमा आहे. अरविंद केजरीवाल यांना ५३ टक्के मुख्यमंत्री पदासाठी कौल मिळत आहे.
दिल्लीतील ७० जागांपैकी आम आदमी पक्ष सत्ता स्थापन करेल असे भाकीत एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आले आहे. आम आदमी पक्षासारख्या नवख्या पक्षाने नरेंद्र मोदी आणि भाजपसमोर तगडे आव्हान निर्माण केले. मोदी आणि केजरीवाल यांच्यातील थेट लढत टाळण्यासाठी भाजपने आयत्यावेळी किरण बेदी यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषीत करत केजरीवाल विरुद्ध बेदी असे चित्र निर्माण केले. मात्र, त्याचा प्रभाव दिसून आला नाही. भाजपवर हे बुमरॅंग झाल्याचे दिसत आहे.
#TCExitPoll #DelhiElections Seat Projection
AAP : 48 ± 6 Seats
BJP+ : 22 ± 6 Seats
Congress: 0 ± 2 Seats
Others : 0 ± 2 Seats
— Today's Chanakya (@TodaysChanakya) February 7, 2015
किरण बेदींच्या प्रवेशामुळे भाजपतील स्थानिक नेत्यांमध्ये नाराजी होती. मात्र या नाराजीकडे दुर्लक्ष करत भाजप नेतृत्वाने किरण बेदींना पाठिंबा दिला. तर दुसरीकडे आम आदमी पक्षाने नियोजनबद्ध प्रचार करत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. अजय माकन यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस निवडणूक लढवत असली तरी खरी लढत आप विरुद्ध भाजप दिसून येत आहे. काँग्रेसला केवळ ४ जागा मिळतील. तर काहींनी भाजपच्या पदरात एकही जागा टाकलेली नाही. भाजपला २३ ते २७ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर 'आप'ला ३ ७ ते ४३ पर्यंत जागा मिळण्याची शक्यता आहे.
एक्झिट पोलमध्ये 'आप'चे पारडे जड दाखवण्यात आले आहे. तर भाजपाला यंदा दिल्ली पहिल्या क्रमांकावरुन दुस-या स्थानावर समाधान मानावे लागेल. काँग्रेस तिसऱ्या स्थानावर असेल, असे या एक्झिट पोलमध्ये म्हटले आहे. एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरला तर भाजपासाठी हा मोठा हादरा असल्याचे राजकीय तज्ज्ञांनी सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.