उमर खालिद JNU वादाचे खरं 'मूळ', काश्मिरी युवकासोबत बनवला प्लान - रिपोर्ट

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात संसदेवरील हल्ल्यातील दोषी अफझल गुरूच्या फाशीला विरोध करणाऱ्या कार्यक्रमाची रूप रेषा  उमर खालीद या युवकाने तयार केली होती. हा खुलासा पोलिसाकडून अटक करण्यात आलेला जेएनयू छात्रसंघाचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार याने केला आहे. कन्हैय्यानुसार उमरला भेटायला काश्मीरहून काही संशयीत युवक येत होते. 

Updated: Feb 16, 2016, 06:40 PM IST
उमर खालिद JNU वादाचे खरं 'मूळ', काश्मिरी युवकासोबत बनवला प्लान - रिपोर्ट  title=

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठात संसदेवरील हल्ल्यातील दोषी अफझल गुरूच्या फाशीला विरोध करणाऱ्या कार्यक्रमाची रूप रेषा  उमर खालीद या युवकाने तयार केली होती. हा खुलासा पोलिसाकडून अटक करण्यात आलेला जेएनयू छात्रसंघाचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार याने केला आहे. कन्हैय्यानुसार उमरला भेटायला काश्मीरहून काही संशयीत युवक येत होते. 

कन्हैय्याचा आरोप काश्मिरी युवकांनी दिल्या घोषणा 

भारताचे तुकडे करण्याचा आणि अफझल गुरू याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणारे युवक हे काश्मिरी होते. ७ फेब्रुवारी रोजी जेएनयू परिसरात १० कश्मिरी युवक आले होते. अशा प्रकारे कार्यक्रम आयोजीत करण्याचे अनेक महिन्यांपासून ठरले होते. काश्मिरी युवक जेएनयूत घुसल्यानंतर दुसऱ्या दिवशी मोठा वाद निर्माण झाला होता. विद्यार्थ्यांनी अफजल आणि मकबूलच्या फाशीला न्यायालयीन हत्या जाहीर केले. आंदोलन करताना देशद्रोही घोषणा केल्या. 

सीपीआयच्या विद्यार्थी संघटनेशी जोडला गेला आहे कन्हैय्या

घटनेनंतर पोलिसांनी जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्ता कन्हैया कुमार याला अटक केले. त्याला रिमांडमध्ये पाठविले.