नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारचे अच्छे दिनच्या वचनावर भारतीय उद्योग विश्व मोठा दाव लावत आहे. भारतीय कंपन्यांनी २०१५मध्ये केवळ नियुक्त्या वाढविण्याची योजनाच नाही बनवली तर ते या वर्षी वेतनातही वाढ करणार आहे.
कंपन्यांनी आपली वर्कफोर्स १५ ते २० टक्क्यांनी वाढविण्याचा विचार केला आहे. त्यामुळे रोजगार क्षेत्रात तीन ते पाच लाख नव्या नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. कंपन्यांतील कर्मचाऱ्यांच्या वेतनात १० ते १२ टक्क्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. काही पदांमध्ये वेतनवृद्धी ३० टक्क्यांपर्यंत होऊ शकते.
जागतिक कंपनी हे ग्रुप नुसार भारतीय कंपन्या २०१५ मध्ये सरासरी वेतन १०.५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. हे आशियातील इतर देशांच्या तुलनेत अधिक आहे. २०१४ मध्येही सरासरी १०.६ टक्के होते. स्टाफिंग कंपनी टीमलीज सर्व्हिसेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष कुणाल सेन यांनी सांगितले की, आयटी, आरोग्य सेवा, फार्मा, विनिर्माण, इंजिनियरिंग आणि रिटेल क्षेत्रातील नोकऱ्यांमध्य़े नोकऱ्या वाढणार आहे. तर दूरसंचार, एफएमसीजी आणि वित्तीय सेवा क्षेत्रातही नोकऱ्यांची संख्या चांगली वाढणार आहे.
कुशल व्यक्तींनी आकर्षित करण्यासाठी किंवा त्यांना आपल्या कंपनीत ठेवण्यासाठी वेतन वृद्धीशिवाय अनेक मार्ग निवडू शकतात. वेलनेस कार्यक्रम, सेवानिवृत्ती मॉडेल, वित्तीय वेलनेस आमि कॉलेजशी टायअप करून टॅलेंटला पूल करण्याचीही शक्यता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.