न्यू लूकमध्ये 'पोस्टमन काका' पुन्हा येणार तुमच्या दारावर

प्रत्येकाच्या घरी पत्र वाटत फिरणारे खाकी कपड्यातील पोस्टमन काका काळाच्या ओघात कुठेतरी हरवल्याची जाणीव होत होती.हल्लीच्या लोकांना पोस्टाचा तर अगदी विसरच पडला आहे. काचे पलिकडच्या आणि थकल्या  स्वरात उलटं उत्तर देणाऱ्या पोस्टातील कर्मचाऱ्यांनाही आता इंटरनेटच्या युगात काही काम शिल्लक राहिलेलंच नाही.

Updated: Dec 15, 2014, 10:57 AM IST
न्यू लूकमध्ये 'पोस्टमन काका' पुन्हा येणार तुमच्या दारावर title=

मुंबई : प्रत्येकाच्या घरी पत्र वाटत फिरणारे खाकी कपड्यातील पोस्टमन काका काळाच्या ओघात कुठेतरी हरवल्याची जाणीव होत होती.हल्लीच्या लोकांना पोस्टाचा तर अगदी विसरच पडला आहे. काचे पलिकडच्या आणि थकल्या  स्वरात उलटं उत्तर देणाऱ्या पोस्टातील कर्मचाऱ्यांनाही आता इंटरनेटच्या युगात काही काम शिल्लक राहिलेलंच नाही.

परंतु लवकरच पोस्टाची ही अवकळा संपणार आहे. भारतीय डाक विभागाला केंद्र सरकारनं कॉर्पोरेट लूक देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं पुन्हा एकदा दारावर येणाऱ्या पोस्टमनची आतुरतेनं वाट पाहिली जाण्याची शक्यता आहे.

गेल्या काही वर्षांपासून डाकघर हे इतिहास जमा होण्यीची भीती प्रत्येकाच्या मनात होती. मोबाईल, एसएमएस, इंटरनेट, फेसबुक, व्हॉट्स अॅप या अत्याधुनिक साधनांमुळे गेल्या काही वर्षात ही भीती निर्माण झाली होती. मात्र कुठल्या गावात, खेड्यात, शहरात, गल्लीबोळात पत्र पोहोचवू शकणाऱ्या या डाक विभागाला पुनरुज्जिवित करण्याचं केंद्र सरकारनं ठरवलं आहे.

देशभरात दीड लाखांहून अधिक पोस्ट कार्यालये आहेत. पोस्ट कार्यालयाचं जाळं कानाकोपर्या्त पोहोचलेलं असल्यामुळं त्याचा वापर करून घेण्याचं केंद्र सरकारनं ठरवलं आहे. त्याकरीता डाक विभागाचा कायापालट करण्यासाठी एक टास्क फोर्स नेमण्यात आला होता. या टास्क फोर्सनं सुचविलेल्या शिफारशी अंमलात आणण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. 

या शिफारशीत काय म्हटले आहे?

सध्या डाक विभागातर्फे पत्र वितरणाबरोबरच बचत खाती, विमा योजना यांचेही पैसे जमा करण्याचं काम केलं जातं. तसंच काही इ- कॉमर्स कंपन्यांसाठीही काम केलं जातं. या दोन्ही गोष्टी व्यापक स्तरावर करण्यासाठी पोस्ट विभागांतर्गत बँकिंग आणि आर्थिक सेवा देणारी एक कंपनी स्थापन करावी, असं या शिफारशीत म्हटलं आहे. तसंच पार्सल पोहोचवणारी एक सार्वजनिक कुरिअर कंपनीही स्थापन करावी, असंही म्हटलं आहे. तसंच केंद्र सरकारच्या विविध सेवांसाठीही डाक विभागाचा उपयोग करावा, सरकारी प्रमाणपत्र, आवेदनपत्र, विविध बिलांचे पैसे जमा करणं अशा ३०० सेवांसाठी पोस्ट खात्याचा वापर करता येईल, असंही या शिफारशीत म्हटलं आहे.

लाखोंना रोजगाराच्या संधी

पोस्टातल्या भरपूर पगाराच्या नोकरीचे एकेकाळी लोकांना खूप आकर्षण होतं. याच पोस्टाचा कायापालट केल्यानंतर पुन्हा एकदा डाक विभागात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल. शिफारशी अंमलात आणल्यास पुढील चार पाच वर्षात लाखो लोकांना आणि विविध सेवांतर्गत आणखी लाखो लोकांना रोजगार मिळणार आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.