'देशात पुन्हा आणीबाणीची शक्यता नाकारता येत नाही'

देशात पुन्हा आणीबाणी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी म्हटलंय, यावरून अडवाणी यांनी पुन्हा एकदा केंद्रावरील नाराजी स्पष्ट केल्याची चर्चा आहे. 

Updated: Jun 18, 2015, 08:48 PM IST
'देशात पुन्हा आणीबाणीची शक्यता नाकारता येत नाही' title=

नवी दिल्ली : देशात पुन्हा आणीबाणी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी म्हटलंय, यावरून अडवाणी यांनी पुन्हा एकदा केंद्रावरील नाराजी स्पष्ट केल्याची चर्चा आहे. 

अडवाणी यांनी 'इंडियन एक्सप्रेस' या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केलं आहे.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेल्या आणीबाणीला २५ जून रोजी ४० वर्षे पूर्ण होत आहेत. १९७५ ते ७७ या दरम्यान भारतात अणीबाणी होती. या पार्श्वभूमीवर अडवाणी यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.