जयललितांच्या अण्णाद्रमुक पक्षाचे निवडणूक चिन्ह गोठवले

तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या अण्णाद्रमुक पक्षाचं निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाकडून गोठवण्यात आले आहे. अण्णाद्रमुकमधल्या पनीरसेल्व्हम आणि शशिकला यांच्यात या चिन्हावरुन संघर्ष सुरु आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 23, 2017, 08:24 AM IST
जयललितांच्या अण्णाद्रमुक पक्षाचे निवडणूक चिन्ह  गोठवले title=

नवी दिल्ली : तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या अण्णाद्रमुक पक्षाचं निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाकडून गोठवण्यात आले आहे. अण्णाद्रमुकमधल्या पनीरसेल्व्हम आणि शशिकला यांच्यात या चिन्हावरुन संघर्ष सुरु आहे.

चेन्नईमधल्या आर. के. नगर या भागातल्या पोटनिवडणूकीसाठी पक्षाचं चिन्ह आपल्याला मिळावं यासाठी या दोन्ही गटांनी प्रयत्न चालवले होते पण आता या दोन्ही गटांना पक्षाचं चिन्ह वापरता येणार नाही असं निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.

या चिन्हावर हक्क सांगण्यासाठी दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर निवडणूक आयोगाकडे मोर्चेबांधणी करण्यात आली होती. निवडणूक आयोगाचे निर्देश आम्हाला मिळाले नसल्याची भूमिका पन्नीरसेल्व्हम् गटाने घेतली आहे. तर निवडणूक चिन्ह आम्हाला मिळालं नाही तरी त्याचा आर के नगर मधल्या पोटनिवडणुकीतल्या आमच्या कामगिरीवर काहीही परिणाम होणार नसल्याचा दावा शशिकलांच्या गटाने केला आहे.