काळा पैसा पांढऱ्या करणाऱ्या दोन बँक मॅनेजर्सला अटक

काळा पैसा सफेद करणाऱ्या अॅक्सिस बँकेच्या दोन मॅनेजर्सला पोलिसांनी अटक केली आहे. दोन्ही आरोपींना ईडीने मनी लाँड्रिग अॅक्टनुसार अटक केली आहे. लाच घेऊन ४० कोटींचा काळा पैसा सफेद करण्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

Updated: Dec 5, 2016, 10:24 AM IST
काळा पैसा पांढऱ्या करणाऱ्या दोन बँक मॅनेजर्सला अटक title=

लखनऊ : काळा पैसा सफेद करणाऱ्या अॅक्सिस बँकेच्या दोन मॅनेजर्सला पोलिसांनी अटक केली आहे. दोन्ही आरोपींना ईडीने मनी लाँड्रिग अॅक्टनुसार अटक केली आहे. लाच घेऊन ४० कोटींचा काळा पैसा सफेद करण्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

आरोपींनी लाच म्हणून सोन्याची वस्तू मागितली होती. ईडीने छापे टाकत सोन्याची वस्तू जप्त केली आहे. ४० कोटींची रक्कम आरटीजीएसच्या माध्यमातून ज्वेलर्सच्या अकाउंट्समध्ये टाकली गेली होती. नोटबंदीनंतर ४० कोटीच्या काळ्या पैशातून सोनं खरेदी केलं गेलं होतं.

सराफा व्यापाऱ्याने पैसा पांढरा करण्यासाठी अॅक्सिस बँकेच्या दोन कर्मचाऱ्यांना संपर्क केला होता. अटकेत असलेले दोन्ही आरोपींना सोमवारी कोर्टात हजर केलं जाणार आहे. पोलीस या आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी करतील कारण यामध्ये सहभागी इतर आरोपींना देखील पकडता यावं. यामध्ये आणखी काही लोकांना अटक होण्याची शक्यता आहे.