पाटणा : बिहारमध्ये पॉप्युलेशन कंट्रोलसाठी पानवाल्याची सॉलिड शक्कल लढविली आहे. फॅमिली प्लॅनिंगसाठी अजब आयडिया शोधून काढली आहे. तो पानाबरोबर कंडोम फ्री देतोय.
खय के पान बनारसवाला. खुल जाए बंद अकल का ताला, असं 'डॉन' अमिताभ बच्चन सांगायचा. पण आता बिहारच्या कटिहार जिल्ह्यातल्या एका पानवाल्यानं लोकांची बंद अकल खोलण्यासाठी वेगळीच शक्कल लढवलीय.
फलका बाजार गावातला नंदलाल साह नावाच्या या पानवाल्यानं कुटुंब नियोजनाबाबत जनजागृती करण्यासाठी एकदम हट के उपाय शोधलाय. त्याच्या दुकानावर पान घेणाऱ्या ग्राहकांना तो कंडोम देतो. तोही अगदी फुकटात.
एका पानावर एक कंडोम फ्री, अशी स्कीमच नंदलालनं सुरु केली आहे. विशेष म्हणजे पानवाल्याची ही आयडिया भलतीच क्लिक झालीय. त्याच्या दुकानासमोर पान विकत घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी उसळलेली असते. वाढत्या लोकसंख्येला आवर घालण्यासाठी एका पानवाल्याचा हा प्रयत्न निश्चितच दाद देण्याजोगा आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.