नवीन उद्योजकांसाठी अर्थमंत्र्यांनी दिली खुशखबर...

आता, तुम्हाला तुमचा स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा असल्यास परवानग्या मिळवण्याचा धसका घेऊ नका...

Updated: Feb 28, 2015, 01:56 PM IST
नवीन उद्योजकांसाठी अर्थमंत्र्यांनी दिली खुशखबर...  title=

नवी दिल्ली : आता, तुम्हाला तुमचा स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा असल्यास परवानग्या मिळवण्याचा धसका घेऊ नका...

कारण, उद्योन्मुख आणि स्वकर्तबगार नागरिकांची अडचण लक्षात घेऊन केंद्र सरकारनं लवकरच एक ई-बिझनेस पोर्टल सुरू करणार असल्याचं जाहीर केलंय. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी तशी घोषणाच संसदेत अर्थसंकल्प 2015-16 जाहीर करताना केलीय.

अर्थमंत्र्यांच्या या घोषणेमुळे स्वत:चा नागारिकांना व्यवसाय सुरु करताना विविध परवानग्या मिळवण्यासाठी होणाऱ्या त्रासाला सामोरं जावं लागणार नाही. एका क्लिकसरशी तुम्हाला या परवानग्या मिळू शकतील. सध्या, शासन दरबारी घालावे लागणारे खेटे उद्योन्मुख उद्योजकांना घालावे लागणार नाहीत. 

उद्योजकांना आणि गुंतवणुकदारांना अल्पावधीत विविध परवानग्या आणि परवाने केवळ एका ई-प्लॅटफॉर्मवर मिळू शकतील.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.