'जयपूर फेस्ट'मध्ये डॉ. सुभाष चंद्रा यांची प्रकट मुलाखत

जयपूरमध्ये आजपासून साहित्यिकांचा महाकुंभ भरलाय. यामध्ये एस्सेल ग्रुपचे चेअरमन डॉ. सुभाष चंद्रा यांच्या आत्मकथेचं प्रकाशन इथे होतंय. 

Updated: Jan 22, 2016, 11:54 AM IST
'जयपूर फेस्ट'मध्ये डॉ. सुभाष चंद्रा यांची प्रकट मुलाखत title=

जयपूर : जयपूरमध्ये आजपासून साहित्यिकांचा महाकुंभ भरलाय. यामध्ये एस्सेल ग्रुपचे चेअरमन डॉ. सुभाष चंद्रा यांच्या आत्मकथेचं प्रकाशन पार पडलंय.

यावेळी, एस्सेल ग्रुपचे चेअरमन डॉक्टर सुभाष चंद्रा यांच्या दी झेड फॅक्टर - My Journey as the wrong man at the right time या आत्मचरित्राचं प्रकाशन होतंय. ज्येष्ठ पत्रकार एम. जे. अकबर डॉक्टर सुभाष चंद्रा यांची प्रकट मुलाखत घेतली.

'झी जयपूर लिटरेचर फेस्टिवल'चं उद्घाटन राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या हस्ते झालं... २५ तारखेपर्यंत चालणाऱ्या या साहित्याच्या कुंभमेळ्यात २० देशांमध्यल्या २५ भाषांमध्ये लिखाण करणारे २२२ वक्ते सहभागी होणार आहेत.

बुकर पुरस्कार विजेते लेखक मॅलन जेम्सदेखील या संमेलनामध्ये सहभागी होणार आहेत. जयपूरच्या दिग्गी पॅलेस हॉटेलमध्ये होणाऱ्या या साहित्य संमेलनाचं यंदा नववं वर्ष आहे.