'नातेवाईकांना तिकीट देण्यासाठी दबाव नको'

आगामी निवडणुकांसाठी नातेवाईकांना तिकीट देण्यासाठी दबाव टाकू नका या शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वपक्षातल्यांना सुनावलं आहे.

Updated: Jan 7, 2017, 08:38 PM IST
'नातेवाईकांना तिकीट देण्यासाठी दबाव नको' title=

नवी दिल्ली : आगामी निवडणुकांसाठी नातेवाईकांना तिकीट देण्यासाठी दबाव टाकू नका या शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वपक्षातल्यांना सुनावलं आहे. भारतीय जनता पार्टीच्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक नवी दिल्लीमध्ये झाली. या बैठकीमध्ये मोदींनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं. राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणगीबाबत पारदर्शकता आणण्यासाठी भाजप आग्रही आहे, असंही मोदी म्हणाले आहेत.

दरम्यान अमित शहा यांनी भ्रष्टाचारामुळे विरोधक नोटबंदीला विरोध करत असल्याची टीका केली. पश्चिम बंगाल मधील हिंसक परिस्थितीला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोपही शहा यांनी केला. अरूण जेटली यांनी नोटबंदीमुळे सरकारचा महसूल वाढल्याचे निदर्शनास आणले.