नवी दिल्ली : दिल्लीच्या एका रुग्णालयात डॉक्टरांनी एक महत्त्वपूर्ण सर्जरी करण्यात यश मिळविले आहे. या सर्जरीत एका तरुणीच्या एक स्तन विकसित करण्यात आले आहे. यासाठी तिच्या जांघेच्या चरबीचा वापर करण्यात आला. ही महिला पोलंड सिंड्रोम या आजाराने ग्रस्त होती.
सर गंगाराम रुग्णालयातील प्लास्टिक आणि कॉस्मेटिक सर्जरी विभागातील डॉक्टर विवेक कुमारने सांगितले की, पोलंड सिंड्रोम एक अनुवांशिक समस्या आहे. जी मुख्यत्वे किशोरवयात दिसते. या आजारात महिलेच्या स्तनाचा एक भाग विकसीत होत नाही.
इंदूरमध्ये राहणाऱ्या २३ वर्षीय तरूणीला पोलंड सिंड्रोमने ग्रस्त असल्याचे समजले. या तरुणीने इंटरनेटच्या माध्यमातून इलाजासाठी डॉ़क्टरांचे पत्ते शोधले.
या माध्यमातून तरूणी रुग्णालयात पोहचली. डॉक्टरांनी जांघेच्या चरबीचा वापर करून तिच्या स्तनाचा एक भाग विकसित केला.
गेल्या वर्षी २८ जून रोजी सर्जरी करण्यात आली होती. सर्जरीवेळी जांघेतून चरबी काढण्यात आली होती. तिचा वापर तरूणीचा उजवा भाग विकसित करण्यासाठी वापण्यात आला होता. या चरबीला इंजेक्ट करण्यास खूप काळजी घेण्यात आल्याचे कुमार यांनी सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.