मुलायम सिंग बनले 'फादर ऑफ मुस्लिम'!

रस्त्यापासून ते संसदेपर्यंत मुस्लिमांचे प्रश्न हिरीरीनं मांडणाऱ्या समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांना 'फादर ऑफ मुस्लिम'ची उपाधी देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आलीय. तसंच त्यांच्याच पायावर पाय ठेऊन वाटचाल करणाऱ्या मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना 'व्हॉइस अॅन्ड फ्रेंड ऑफ मुस्लिम्स' अशी उपाधी दिली गेलीय. हिंदुस्थान फ्रंट नावाच्या संघटनेनं ही घोषणा केलीय.   

Updated: Dec 24, 2014, 03:26 PM IST
मुलायम सिंग बनले 'फादर ऑफ मुस्लिम'! title=

लखनऊ : रस्त्यापासून ते संसदेपर्यंत मुस्लिमांचे प्रश्न हिरीरीनं मांडणाऱ्या समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांना 'फादर ऑफ मुस्लिम'ची उपाधी देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आलीय. तसंच त्यांच्याच पायावर पाय ठेऊन वाटचाल करणाऱ्या मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना 'व्हॉइस अॅन्ड फ्रेंड ऑफ मुस्लिम्स' अशी उपाधी दिली गेलीय. हिंदुस्थान फ्रंट नावाच्या संघटनेनं ही घोषणा केलीय.   
 
फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या 'मुस्लिम अधिकार आणि सन्मान संमेलना'च्या निमित्तानं हिंदुस्थान फ्रंट या दोन्ही नेत्यांना सन्मानपत्र बहाल करणार आहे. मंगळवारी फ्रंटचे अध्यक्ष काल शंकर यांच्या अध्यक्षतेखाली यूपी कोऑपरेटिव्ह बँकेच्या गेस्ट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत मुस्लिम समाजाचे अधिकार, सन्मान आणि सुरक्षा या विषयांवर चर्चा पार पडली. बैठकीनंतर काली शंकर यांनी सपाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांना देशातील मुस्लिमांच्या हितांचं रक्षण करणाऱ्यासाठी 'फादर ऑफ मुस्लिम्स' या सन्मानानं गौरविण्यात येईल अशी माहिती दिलीय. 

तसंच, मुस्लिमांचं कल्याण आणि विकाससाठी सरकारी योजना चालविण्यासाठी आणि उत्तर प्रदेशात झालेल्या जातीय दंगलींमध्ये मुस्लिमांचं संरक्षण करण्यासाठी केलेल्या कार्याला सन्मानित करण्यासाठी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना 'व्हॉइस अँन्ड फ्रेंड ऑफ मुस्लिम्स' या उपाधिनं सन्मानित करण्यात येणार आहे.

याच बैठकीत, आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्याविरुद्ध केंद्र सरकारनं कडक कारवाई करण्याची मागणी केलीय. तसंच गोरखपूरचे खासदार योगी आदित्यनाथ यांच्या भडकाऊ भाषणांना आळा घालण्यात यावं, आणि महात्मा गांधी यांचा हत्यारा नथूराम गोडसे याला राष्ट्रद्रोही म्हणून घोषित करावं, अशीही मागणी यावेळी करण्यात आलीय. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.