विमानप्रवास करू इच्छिणाऱ्यांसाठी खूश खबर!

विमान प्रवास करू इच्छिणाऱ्या सर्वसामान्य लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. ज्यांनी आत्तापर्यंत कधीच विमान प्रवास केला नाही, त्यांच्यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध होत आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 4, 2013, 05:00 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
विमान प्रवास करू इच्छिणाऱ्या सर्वसामान्य लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. ज्यांनी आत्तापर्यंत कधीच विमान प्रवास केला नाही, त्यांच्यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध होत आहे. अनेक एअरलाईन्सनी आपल्या विमानांची तिकीटं काही काळासाठी कमी केली आहेत.
जेट एअरवेजने एक ऑफर सुरू केली आहे. ९ ऑगस्टपूर्वी तिकिट बुक करणाऱ्यांसाठी कमी पैशांत विमान प्रवास मिळणार आहे. ७५० किमीपेक्षा कमी अंतराचा प्रवास करणाऱ्यांना १,७७७ रुपयांमध्ये प्रवास करायला मिळणार आहे. तर ७५० किमी ते १००० किमी अंतर असल्यास २,७७७ रुपये तिकिट असेल. १००० किमीपेक्षा अधिक अंतरावरील प्रवासासाठी ३,७७७ रुपये तिकिट असेल.
मात्र या तिकिटावर टॅक्स मात्र प्रवाशांनाच भरावा लागणार आहे. १० ऑगस्टनंतर हे प्रवास सुरू होतील. विमानातील बहुतेक सुविधा या तिकिटात प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत. सध्या मंदी असल्यामुळे जेट एअरवेजने ही सुविधा सुरू केल्याचं सांगण्यात येत आहे

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.