नवी दिल्ली : आरबीआयने सोमवारी काढलेल्या नव्या आदेशाने जिल्हा बँकांच्या व्यवस्थापनांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय.
आरबीआईनं 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा स्विकारण्यास आणि बदलून देण्याससुद्धा जिल्हा बँकांना बंदी घातलीये. त्यामुळे जिल्हा बँकांमध्ये पैसे भरायला जाणाऱ्यांची मोठी निराशा होणार आहे.
जिल्हा बँकांमधून पैसे काढण्यास मात्र मनाई नाही. आठवड्याला 24 हजारची मर्यादा पाळून ग्राहकांना पैसे देण्याचे निर्देश बँकांना देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्हा बँकांशी संबंधित क्रेडिट सोसायट्या, सहकारी संस्था अडचणीत आल्यात.