महामार्गांवर दारु विक्रीसाठीच्या अंतराची मर्यादा कमी

राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरती दारुविक्रीसाठीची अंतराची मर्यादा कमी करण्यात आली आहे.

Updated: Apr 5, 2017, 08:32 PM IST
महामार्गांवर दारु विक्रीसाठीच्या अंतराची मर्यादा कमी  title=

नवी दिल्ली : राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरती दारुविक्रीसाठीची अंतराची मर्यादा कमी करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयानं ३१ मार्चला दिलेल्या आदेशानुसार महामार्गावरती ५०० मीटर अंतरापर्यंत दारुविक्रीला मनाई करण्यात आली होती.

आता ही मर्यादा आणकी कमी करुन २२० मीटर इतकी करण्यात आली आहे. २० हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरी भागांसाठी हा सुधारीत नियम सर्वोच्च न्यायालयानं लागू केला आहे.