www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
देशात महागाईचा भडका उडण्याची अधिक चिन्हं आहेत. कांद्याने पेट्रोल आणि डिझेलला मागे टाकत ७० रूपयांपर्यंत मजल मारली आहे. यातच आता डिझेलची ३ रूपयांनी दरवाढ करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहे. आधी दरमहिन्याला ५० पैसे वाढ होणार होती.
डिझेलच्या प्रतिलिटर ३ रूपये दरवाढीचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव कॅबिनेटच्या बैठकीत सादर करण्यात येणार आहे. त्याला मंजुरी देण्यात आल्यास प्रत्येक महिन्यात ५० पैसे अशी वाढ करण्याची कसरत टाळता येईल, असे पेट्रोलियम मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकार्याणने स्पष्ट केले आहे.
प्रत्येक महिन्यात ५० पैशांनी वाढ करण्यापेक्षा एकाचवेळी दोन ते तीन रुपयांची दरवाढ करण्याच्या तेल कंपन्यांच्या प्रस्तावावर सरकार गंभीरपणे विचार करीत आहे. त्यामुळे डिझेल दरवाढीचे संकेत मिळाले आहेत. मात्र, स्वयंपाकाचा गॅस आणि रॉकेलच्या किमतीत कोणतीही दरवाढ करण्याचा प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट करण्यात आलेय.
आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाचे मूल्य कमी होत आहे. डॉलरच्या तुलनेत रूपयाची सातत्याने घसरण सुरूच आहे. रूपयाचे अवमूल्यन होत असल्याने डिझेलचा उत्पादन खर्च आणि किरकोळ विक्री यात मोठी तफावत आहे. ही तफावत कमी करण्यासाठी सरकारने काही महिन्यांपूर्वी डिझेलच्या किमती नियंत्रणमुक्त करतानाच सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांना प्रत्येक महिन्यात ५० पैशांनी दरवाढ करण्याची परवानगी दिली होती. मात्र, आता तसे न होता सरसकट २ ते ३ रूपये दरवाढ करण्याचा घाट सुरू आहे. तेल कंपन्यांना होणारा तोटा भरून काढण्यासाठी ही दरवाढ असल्याचे म्हटले जात आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.