पेट्रोल, डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता

आज मध्यरात्रीपासून पेट्रोल, डिझेलचे दर पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे १ सप्टेंबरपासून देशात पेट्रोल, डिझेलचे दर कमी होणार असल्याचं कळतंय.

Updated: Aug 31, 2015, 01:15 PM IST
पेट्रोल, डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता title=

नवी दिल्ली: आज मध्यरात्रीपासून पेट्रोल, डिझेलचे दर पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे १ सप्टेंबरपासून देशात पेट्रोल, डिझेलचे दर कमी होणार असल्याचं कळतंय.

आणखी वाचा - पेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता

२ ते ३ रुपयांनी पेट्रोल, डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता आहे. यापूर्वी १५ ऑगस्टला पेट्रोल डिझेलच्या किमती कमी झाल्या होत्या. दिल्लीत पेट्रोल १.२७ रुपयांनी आणि डिझेल १.१७ रुपयांनी स्वस्त झालं होतं. 

आणखी वाचा - जागतिक मंदीमुळे सोने झाले स्वस्त

गेल्या दोन आठवड्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात क्रुड ऑईलच्या किमतीत घसरण सुरू आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.