आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सची सॅल्यूट करण्याची पद्धत वेगळी का असते?

आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सचे जवान अथवा अधिकारी सॅल्यूट करतात तेव्हा या तिन्ही दलांची सॅल्यूट करण्याची पद्धत वेगवेगळी असते. सॅल्यूट करताना हात किती अंशात वळावा याचे नियम घालून दिलेले आहेत. त्यानुसार प्रत्येक दलाचे जवान अथवा अधिकारी सॅल्यूट मारतात.

Updated: Sep 29, 2016, 09:17 AM IST
आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सची सॅल्यूट करण्याची पद्धत वेगळी का असते? title=

मुंबई : आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सचे जवान अथवा अधिकारी सॅल्यूट करतात तेव्हा या तिन्ही दलांची सॅल्यूट करण्याची पद्धत वेगवेगळी असते. सॅल्यूट करताना हात किती अंशात वळावा याचे नियम घालून दिलेले आहेत. त्यानुसार प्रत्येक दलाचे जवान अथवा अधिकारी सॅल्यूट मारतात.

आर्मी - आर्मीचे जवान अथवा वरिष्ठ अधिकारी सॅल्यूट मारताना त्यांचा हात 180च्या अंशात वळतो. हाताची बोटे आणि अंगठा एकमेकांना चिकटलेले असतात. हाताचे मधले बोट कपाळाच्या बाजूला टेकलेले असते. 

नेव्ही​ - नेव्हीचे जवान अथवा अधिकारी सॅल्यूट करताना त्यांचा हात 90 अंशात वळलेला असतो. त्यांच्या तळहाताची दिशा जमिनीकडे असते. कपाळाला हात टेकलेला असतो. जहाजावरील जवानांचे हात ग्रीस अथवा ऑईलने खराब झालेले असतात ते दिसू नयेत म्हणून अशा पद्धतीने सॅल्यूट मारले जातात.

एअरफोर्स - एअरफोर्सचे जवान अथवा अधिकारी सॅल्यूट मारताना त्यांचा हात 45 अंशात वळलेला असतो. मार्च 2006मध्ये एअरफोर्ससाठी नवे नियम लागू करण्यात आले.