तिरुपती : येथील बालाजीला एका भक्ताने चक्क १ कोटींचे अनोखे दान केले. एका दाम्पत्याने हिरे जडीत मुकुट मंदिरातील भगवान वेंकटेश्वराला चढवला.
कोयंबतूर येथे राहणारे बालामुरुगन आपली पत्नी पौर्णिमासह तिरुपतीला तिरुपती बालाजी मंदिरात आलेत. त्यांनी १ कोटी रुपये किमतीचा हिरे जडीत मुकुट दान केला.
याआधी कर्नाटकमधील माजी मंत्री जनार्दन रेड्डी यांनी तिरुपतीला ४५ कोटींचा हिरे जडीत मुकुट चढवला होता. तर नविन वर्षात ८०,००० भाविकांनी तीन कोटी रुपये दानपेटीत टाकलेत.