माजी नगरसेवकाच्या कार्यालयात सापडलं नोटांचं घबाड

बंगळुरूमध्ये पोलिसांनी माजी नगरसेवक व्ही. नागराजच्या कार्यालयावर छापा टाकला.

Updated: Apr 14, 2017, 10:44 PM IST
माजी नगरसेवकाच्या कार्यालयात सापडलं नोटांचं घबाड  title=

बंगळुरू : बंगळुरूमध्ये पोलिसांनी माजी नगरसेवक व्ही. नागराजच्या कार्यालयावर छापा टाकला. या छाप्यामध्ये पोलिसांनी नोटांचं घबाड सापडलं आहे. या सगळ्या नोटा जुन्या पाचशे आणि एक हजार रुपयाच्या आहेत. पोलिसांना मिळालेल्या या नोटा ४० कोटी रुपयांपेक्षा जास्तच्या आहेत.

एका किडनॅपिंग केसमध्ये पोलिसांनी नागराजच्या कार्यालयावर छापा टाकला असताना पोलिसांना या नोटा सापडल्या आहेत. व्ही. नागराज हा बॉम्ब नागा म्हणूनही ओळखला जातो. याआधीही त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. नागराज हा जेडीएसचा माजी नगरसेवक आहे.

किडनॅपिंगच्या गुन्ह्यामध्ये कार्यालयावर धाड टाकली असता पोलिसांना नोटांबरोबरच काही जमिनीचा कागदपत्र आणि हत्यारंही सापडली आहेत. पोलिसांनी धाड टाकली तेव्हा नागराज त्याच्या घरी आणि कार्यालयामध्ये नव्हता. पोलिसांच्या कारवाईआधीच तो पळून गेल्याचं बोललं जात आहे.