नवी दिल्ली : भ्रष्टाचार, काळा पैसा आणि दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे आणि एक हजाराच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला. मोदींचा हा निर्णय प्रशंसनीय आहे पण या निर्णयाची अंमलबजावणी कोणताही होमवर्क न करता झाल्याची टीका भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हांनी केली आहे.
नोटबंदीचा निर्णय हा सर्जिकल स्ट्राईक असेल तर त्यांनी सर्जिकल स्ट्राईकनंतरची परिस्थिती हाताळण्यासाठी तयार राहायला पाहिजे होतं, असंही शत्रुघ्न सिन्हा म्हणाले आहेत.