डॉन छोटा राजनचा जेलमध्ये 'गेम' करण्याचा दाऊदचा प्लॅन

 दाऊद इब्राहिम याने छोटा राजनचा गेम करण्यासाठी तयारी केल्याचे म्हटले जातेय.  

Updated: Jun 10, 2016, 04:10 PM IST
डॉन छोटा राजनचा जेलमध्ये 'गेम' करण्याचा दाऊदचा प्लॅन title=

नवी दिल्ली : अंडरवर्ल्डमध्ये पुन्हा गॅंगवॉर भडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दाऊद इब्राहिम याने छोटा राजनचा गेम करण्यासाठी तयारी केल्याचे म्हटले जातेय. त्याचा गेम जेलमध्येच करण्यासाठी हालचाली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, डॉन छोटा राजनला संपवण्याच्या हेतूने दिल्लीत आलेल्या चौघांना दिल्ली पोलिसांनी अटक केली. त्यामुळे दाऊदकडून गेम करण्यासाठी हालचाली चालविल्याचे असल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळत आहे. दाऊदच्या उजवा हात छोटा शकील याने छोटा राजनला मारण्यासाठी हे शूटर पाठवल्याचे पुढे आलेय.

गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये इंडोनेशियातील बाली येथे डॉन छोटा राजनला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला भारतात आणले. सध्या छोटा राजन दिल्लीतील तिराह जेलमध्ये आहे. छोटा शकीलने एका तुरुंग अधिकाऱ्याला मेसेज पाठविल्याचे म्हटले गेलेय. त्यात त्यांने राजनला मारण्याची धकमी दिली होती.