दिल्लीचे कायदामंत्री जितेंद्र तोमर यांना अटक

अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळातील कायदामंत्री जितेंद्र तोमर यांना आज दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. बोगस कायदा पदवी प्रमाणपत्र प्रकरणी जिंतेद्र तोमर यांना अटक करण्यात आली आहे.

Updated: Jun 9, 2015, 12:49 PM IST
दिल्लीचे कायदामंत्री जितेंद्र तोमर यांना अटक title=

नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळातील कायदामंत्री जितेंद्र तोमर यांना आज दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. बोगस कायदा पदवी प्रमाणपत्र प्रकरणी जिंतेद्र तोमर यांना अटक करण्यात आली आहे.

तोमर यांनी आपल्याला कोणतीही पूर्वसूचना न देता अटक करण्यात आल्याचे सांगितले आहे, तर आम आदमी पक्षाने  तोमर यांना अटक होणे दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.

कायदामंत्री चौकशीला योग्य सहकार्य करीत नसल्याने त्यांना अटक करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. दिल्लीतील हौज खास पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तोमर यांच्या राजीनाम्याची भाजप आणि काँग्रेसकडून एप्रिल महिन्यापासून मागणी करण्यात येत आहे. बिहारच्या एका विद्यापिठाने दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले की, ‘तोमर यांचे प्रमाणपत्र हे खरे नसून तसा कोणता पुरावाही विद्यापिठात उपलब्ध नाही. तेव्हापासून तोमर यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.