नवी दिल्ली : महिलासुद्धा कुटुंबाची कर्ता होऊ शकते असा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं एका खटल्याच्या सुनावणी दरम्यान दिला आहे.
हिंदू प्रथेपरंपरेप्रमाणे एकत्र कुटुंबात कर्ता पुरुषाचं स्थान विशेष असतं. कुटुंबात जन्मलेलं पहिलं पुरुष अपत्य म्हणून त्याला नैसर्गिकरित्या हा मान मिळतो. मात्र कुटुंबात पहिलं जन्मलेलं स्त्री अपत्य असेल, तर तिलाही कर्त्याचा दर्जा मिळायला हवा, अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झाली होती.
या याचिकेवर मागील आठवड्यात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान न्यायालयानं याचिकाकर्त्या महिलेचा मुद्दा मान्य करत, महिला सुद्धा कुटुंबाची कर्ता होऊ शकते, असा निर्णय सुनावला.