नवी दिल्ली : दिल्लीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गाजावाजा करत सम-विषय योजना सुरु केली. या योजनेचे स्वागत होत असताना काहींनी विरोध केला. याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामुळे ही योजना राहणार की रद्द होणार याकडे लक्ष लागले होते. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने या योजनेला हिरवा कंदील दिलाय.
केजरीवाल सरकारच्यावतीने वाहतुकीबाबत राबविण्यात येणाऱ्या सम-विषम योजनेचा प्रयोग नियोजनाप्रमाणे १५ जानेवारीपर्यंत चालू राहणार आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिलाय. नव्या वाहतूक नियमांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर १५ फेब्रुवारीला सुनावणी घेण्यात येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
या योजनेच्या सूचनेवर हस्तक्षेप करणार नाही, असे न्यायालयाने सांगितले. या योजनेनुसार दिल्लीतील रस्त्यांवर विषम तारखांना फक्त विषम क्रमांक असलेल्या गाड्या आणि सम तारखांना फक्त सम क्रमांकाच्या गाड्या चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे.