सोनिया गांधी रात्री घराबाहेर पडल्या...

सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशी देण्याची मागणी करत विजय चौक, रायसीना हिल्स परिसरात आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांची काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भेट दिली. मध्यरात्री १.००वाजत्या त्या घराबाहेर पडल्यात. आजही सोनिया यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र, ठोस आश्वासन मिळाले नाही.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 23, 2012, 03:42 PM IST

www.24taas.com,नवी दिल्ली

सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशी देण्याची मागणी करत विजय चौक, रायसीना हिल्स परिसरात आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांची काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भेट दिली. मध्यरात्री १.००वाजत्या त्या घराबाहेर पडल्यात. आजही सोनिया यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र, ठोस आश्वासन मिळाले नाही.
विजय चौक, रायसीना हिल्स परिसरात आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी आज पहाटे हटविले. तसेच दिल्लीत पोलीस बंदोबस्तात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. या परिसरात वृत्तवाहिन्यांना वार्तांकनास बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, जमावबंदीचा आदेश देण्यात आला आहे. गर्दी रोखण्यासाठी सात मेट्रो स्टेशन बंद करण्यात आली आहेत.
गँगरेपनंतर दिल्लीत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. आरोपिंना कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी चौकाचौकात निदर्शने करण्यात येत आहे. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने जमावबंदीचा आदेश देण्यात आला आहे. तरीही आंदोलक गप होण्यास राजी नसल्याने रात्री एक वाजता सोनिया गांधी यांनी भेट देवून कारवाई करण्याबाबत आश्वासन दिले.

१० जनपथबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी सोनिया गांधी यांनी रात्री १५ मिनिटे चर्चा केली. यावेळी शांत राहा, असे आवाहन सोनिया गांधी सांगितले, कारवाई केली जाईल. उद्या सकाळी भेट घेईन. मात्र, आज सकाळी भेट घेतल्यानंतर ठोस आश्वासन मिळाले नाही. यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनीही चर्चा केली. परंतु आंदोलन कर्त्यांची आश्वासनावर बोलवण केली केली. त्यामुळे नाराजीचा सूर कायम असल्याचे दिसून आले.