दिल्ली गँगरेप : ‘तो’ अल्पवयीन नाही!

गेल्या महिन्यात १६ डिसेंबर रोजी बसमध्ये तरुणीवर झालेल्या गँगरेप प्रकरणातला सहावा आरोपी अल्पवयीन नाही, हे आता सिद्ध झालंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 22, 2013, 10:50 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
गेल्या महिन्यात १६ डिसेंबर रोजी बसमध्ये तरुणीवर झालेल्या गँगरेप प्रकरणातला आरोपी विनय शर्मा अल्पवयीन नाही, हे आता सिद्ध झालंय. या आरोपीच्या हाडांच्या तपासणीचा रिपोर्टमध्ये हा आरोपी अल्पवयीन नसल्याचं नमूद करण्यात आलंय. त्यामुळे शर्मावर आरोपीवर इतर आरोपींप्रमाणे खटला चालवून शिक्षा सुनावली जाऊ शकते.
विनय शर्मा असं या आरोपीचं नाव आहे. दिल्लीमधल्या बहुचर्चित गँगरेप्रकरणातला तो एक मुख्य आरोपी आहे. आपण अल्पवयीन असल्याचा दावा विनय शर्मानं सोमवारी केला होता. आपल्या शाळेच्या दाखल्यावरची तारीख चुकीची असून आपण १८ वर्षांपेक्षा कमी असल्याचा दावा त्यानं कोर्टात केला होता. त्यासाठी आपल्याही हाडांची चाचणी केली जावी, अशी मागणी त्यानं केली होती. परंतू, कायदेतज्ज्ञ आणि फॉरेन्सिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, शर्मा हा सध्या १९ वर्षांचा आहे, रिपोर्टनुसार तो १८ वर्षांपेक्षा कमी असू शकत नाही. पुढील सुनावणीदरम्यान हा रिपोर्ट दिल्ली कोर्टासमोर सादर करण्यात येणार आहे.

कोर्टामध्ये विनय शर्मा १८ वर्षांपेक्षा कमी असल्याचं सिद्ध झाल्यास तो पुढच्या एका महिन्यात सुधारणागृहातून बाहेर पडेल. पण, तो १८ वर्षांपेक्षा जास्त असल्याचं सिद्ध झाल्यास त्याला इतर आरोपींप्रमाणेच शिक्षा सुनावली जाईल. याच प्रकरणातला आणखी एका आरोपीनं खटल्याच्या सुरुवातीलाच आपण अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. त्याची बाल न्यायालयात पुढील चौकशी सुरू आहे. तर या प्रकरणातील इतर आरोपी राम सिंग, त्याचा भाऊ मुकेश, पवन कुमार, शर्मा आणि ठाकूर यांना सोमवारी फास्ट ट्रॅक कोर्टात हजर करण्यात आलं होतं.