www.24taas.com,नवी दिल्ली
दिल्ली गँगरेप प्रकरणाची धग अद्याप कायम आहे. आंदोलन चिघळू नये यासाठी आजही कलम १४४ अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आलीय. तसच इंडिया गेट परिसर मोकळा करण्यात आलाय. तसच याठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आलीय.
याशिवाय खान मार्केट, पटेल चौक, राजीव चौक असे ९ मेट्रो स्टेशन्स आज बंद ठेवण्यात येणार आहेत. आंदोलकांनी शांतता राखावी असं आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येतय. दुसरीकडे गँगरेपप्रकरणातील पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. ऑपरेशननंतर तिला व्हँटिलेटवर ठेवण्यात आलय. दिल्लीतले तब्बल नऊ मेट्रो स्टेशन बंद असल्यानं दिल्लीकर मेट्रो प्रवाशांचे हाल होतायेत.
संसदभवन आणि केंद्रीय सचिवालय या परिसरात मेट्रोनं येणा-या प्रवाशांची संख्या मोठी असते. त्यामुळं या प्रवाशांचे हाल होतायेत. सकाळीच याचा परिणाम जाणवायला सुरुवात झालीये. दिल्लीत झालेल्या बलात्काराच्या विरोधातील आंदोलन उग्र होत चाललंय. सूत्रांच्या माहितीनुसार या आंदोलनात काही असामाजिक आणि समाजकंटक सामील झालेत. त्यामुळे शांतता आणि सुव्यवस्थेला मोठा धोका होण्याची निर्माण झालीए.
झी 24 तास सर्व नागरिकांना आवाहन करतंय की आपल्या कुटुंबातील सदस्य, मित्र, किंवा परिचित व्यक्ती या आंदोलनात सहभागी झाली असतील तर त्यांनी सुखरुपपणे तत्काळ परत यावं... झी २४ तास तुमच्या भावनांचा आदर करतं. शांततामय मार्गानं आंदोलन करण्याचा अधिकार आहे. अशावेळी त्यांच्यावर लाठीचार्ज करणे हे खेदजनक आहे.
या आंदोलनाचा वापर समाजकटंक हिसंक कारवायासाठी वापर करत आहेत हे वस्तुस्थिती आहे. आज देशात संतापाची लाट आहे. झी २४ तासचे संपादक मंडळ या भावना समजून घेत आहे. या शांततापूर्ण लढ्यात आम्ही तुमच्या बरोबर आहोत. या लढ्यातून समाजकंटकांना दूर ठेवणं गरजेचं आहे. ही आमची भूमिका आहे.
अन्यथा शांततामय मार्गाने आंदोलनं करण्याचा आमचा इतिहास डागाळला जाईल. लोकशाहीशी प्रतारणा आहे. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेसमोर अडचणी निर्माण झाल्यात. त्यामुळेच झी २४ तास आपल्याला आवाहन करतंय की आपण आपल्या कुटुंबीयांना, नातलगांना, आणि मित्रांना सुरक्षितपणे परत येण्याचा सल्ला द्यावा.