www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
राजधानी दिल्ली आणि परिसरात आज भूकंपाचे झटके जाणवले आहेत. मात्र जीवित किंवा वित्त हानी झाल्याचं कुठलंही वृत्त अद्याप आलेलं नाही. या भूकंपाची सुरूवात इराण आणि पाकिस्तानच्या सीमेवर झाली.
या भूकंपाच्या धक्क्यामुळे राजधानी दिल्ली परिसरातील नागरीक घरांबाहेर पडले. अमेरिकेच्या भूमापन सर्वेक्षण संस्थेने दिलेल्या माहितीनुसार भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.८ इतकी होती.
या भूकंपाचा केंद्रबिंदू इराण आणि पाकिस्तानच्या सीमेपासून १५.२ किमींवर होता. इराणमधील ‘खाश’ शहराच्या नैऋत्येला ८६ किमींवर केंद्रबिंदू असल्याचं भारतीय हवामान खात्यानं म्हटलंय. या भूकंपाचे झटके इराण, पाकिस्तान, आणि पश्चिम आशियाच्या मोठया भागाला जाणवले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली परिसरातील उंच इमारती सुरक्षित आहेत. आज दुपारी ४.२० मिनीटांपासून काही सेकंदापर्यंत दिल्ली परिसरात या भूकंपाची कंपनं जाणवली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.