नवी दिल्ली : दिल्लीत पिस्तूलाचा धाक दाखवून एका पोलिस अधिकाऱ्याने महिलेवर बलात्कार केला, ही दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. या प्रकरणी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकास तात्काळ निलंबित करण्यात आलं आहे, या अधिकाऱ्याला न्यायालयाने १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे.
दिल्ली पोलिस कमिश्नर भीमसेन बस्सी यांनी या विषयी पत्रकारांशी बोलतांना सांगितलं, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाविरोधात रानी बाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहितीनुसार, एएसआईने गुरूवारी रिव्हॉल्वरचा धाक दाखवून २३ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
पोलिस कमिश्नर बस्सी म्हणाले, आरोपीवर कडक कारवाई करण्यात येईल, याबाबतीत आम्ही कोणत्याही विभागीय चौकशीची वाट पाहणार नाहीत, या अधिकाऱ्याला आम्ही त्वरीत बडतर्फ करू.
ही घटना अत्यंत गंभीर आहे, पोलिस कमिश्नरने याबाबतीत राजीनामा द्यावा, अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.