www.24taa.com, नवी दिल्ली
बाबा रामदेव यांच्या उपोषणाच्या सहाव्या दिवशी बाबांनी आपलं उपोषण मागे घेतलंय. उपोषण समाप्त झालं असलं तरी आंदोलन मात्र सुरूच राहणार आहे, असं आश्वासन बाबांनी आपल्या समर्थकांना दिलंय.
आंबेडकर मैदानात समर्थकांसमोर `पंतप्रधान हे वैयक्तिक पद नव्हे` असं म्हणत बाबांनी पंतप्रधानांवर घणाघात केलाय. `काँग्रेस आपल्या कर्मानं झाली बदनाम झालीय. भ्रष्टाचारात काँग्रेस पक्ष आघाडीवर आहे. पुन्हा मतदान झालं तर नक्कीच सरकार पडेल’ असंही यावेळी बाबांनी म्हटलंय. पंतप्रधानांवर हल्लाबोल करत बाबांनी त्यांना ‘निर्णय क्षमता नसेल तर पद सोडा’ असं बाबांनी सुनावलंय. सोबतच स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात भूमिका स्पष्ट करण्याची मागणी यावेळी त्यांनी पंतप्रधानांना केलीय. ‘केंद्रानं श्वेत पत्रिका नाही तर खोटी पत्रिका काढलीय… सरकारनं जनतेचा विश्वास गमावलाय’ असं म्हणत बाबांना पुन्हा एकदा ‘'काँग्रेस हटाओ, देश बचाओ'चा नारा दिलाय.
`आम्ही पराभूत नव्हे तर विजयी झालो आहोत, देशातील जनता हीच आंदोलनाची ताकद आहे असं म्हणत बाबांना आपल्या समर्थकांसमोर काँग्रेस सरकारवर जोरदार टीका केलीय. पण, नवे गृहमंत्री चिदंबरम यांच्यासारखे क्रूर नाहीत, असं म्हणत बाबांनी गृहमंत्री सुशीलकुमार यांनाच साद घातलीय.
यावेळी बाबांसोबत भाजप नेते राम जेठमलानीदेखील उपस्थित होते. स्वत: राहुल गांधींकडेच काळा पैसा असल्याचा आरोप, भाजप ज्येष्ठ नेते राम जेठमलानी बाबांच्या मंचावरून केलाय. दरम्यान, बाबा रामदेव आणि समर्थकांनी आंबेडकर मैदान सोडलं असून ते हरिद्वारला रवाना झाले आहेत.