राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांची फूटपाथवर 'चाय पे चर्चा'

उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये ऐतिहासिक विजयानंतर भाजपमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सगळीकडे विजयाचं सेलिब्रेशन होत असतांना भाजपच्या एक मुख्यमंत्री मात्र फुटपाथवर सामान्य लोकांसोबत बसून चहा पितांना दिसल्या. 

Updated: Mar 12, 2017, 09:21 AM IST
राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांची फूटपाथवर 'चाय पे चर्चा' title=

जयपूर : उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये ऐतिहासिक विजयानंतर भाजपमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सगळीकडे विजयाचं सेलिब्रेशन होत असतांना भाजपच्या एक मुख्यमंत्री मात्र फुटपाथवर सामान्य लोकांसोबत बसून चहा पितांना दिसल्या. 

उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पंतप्रधान मोदींची लाट दिसून आली. विजयाचं सर्व श्रेय पंतप्रधान मोदींना देण्यात आलं पण अशा वेळेसच मुख्यमंत्री वसुंधरा राजे या मात्र चहाचा स्वाद घेण्यासाठी आणि लोकांशी चर्चा करण्यासाठी थेट फूटपाथवरील एका चहाच्या टपरीवर जाऊन पोहोचल्या.

मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना अशा प्रकारे पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या. बघता बघता तेथे हजारोंची गर्दी जमा झाली. त्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी 'केसरिया में हरा-हरा, राजस्थान में वसुंधराचे नारे लावले. वसुंधरा राजे यांनी तेथे उपस्थित लोकांशी चर्चा केली. जवळपास १५ मिनिटं त्यांनी लोकांशी चर्चा केली आणि म्हटलं की देशात ही मोदी मॅजिक आहे. इतिहासात पहिल्यांदा भाजपला उत्तर प्रदेशात इतक्या मोठ्या प्रमाणात जागा मिळाल्या आहेत. यासाठी त्यांनी विजयाचा हिरो पंतप्रधान मोदी असल्याचं म्हटलं आहे.