www.24taas.com, नवी दिल्ली
कॉमनवेल्थ घोटाळ्यातील प्रमुख आरोपी सुरेश कलमाडींवर सध्या मेहरबानी सुरू आहे. क्वींन्स बॅटल रिलेप्रकरणी सीबीआयनं दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये कलमाडींचं नाव नसल्यानं सीबीआयच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
क्वीन्स बॅटनप्रकरणी सीबीआयनं शुक्रवारी सीबीआयनं कोर्टात चार्जशीट दाखल केली. यात आयोजन समितीचे तीन अधिकारी, लंडनस्थित बिझनेसमन आणि इतर दोन संस्थांची चार्जशीटमध्ये नावं आहेत. मात्र यात कलमाडींचं नाव नाही त्यामुळे कलमाडींना दिलासा मिळालाय.
दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजनात आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी आयोजन समिती अध्यक्ष खासदार सुरेश कलमाडी यांना सीबीआयने अटक केली होती. क्विन्स बॅटन रिलेच्या आयोजनात गैरव्यवहार केल्याचा गुन्हा दाखल करुन कलमाडींना अटक करण्यात आली होती.
राष्ट्रकुल सारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत घोटाळा केल्याप्रकरणी खासदाराला अटक होण्याची ही देशातली पहिलीच वेळ होती. मात्र काही काळाने त्यांना जामीन मिळाला. तसंच कलमाडी आता राजकारणात पुन्हा सक्रिय होण्याची चिम्हंही दिसू लागली आहेत.