जास्ती जास्त सिगारेट प्या, महसूल द्या - ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालमधल्या चिट फंड घोटाळ्यात बुडालेला पैसा गुंतवणूकदारांना परत देण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारनं पाचशे कोटींचा निधी उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलीय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 25, 2013, 03:30 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, कोलकाता
पश्चिम बंगालमधल्या चिट फंड घोटाळ्यात बुडालेला पैसा गुंतवणूकदारांना परत देण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारनं पाचशे कोटींचा निधी उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलीय. त्यासाठी त्यांनी सिगारेट पिण्याचा सल्ला दिलाय.
मात्र हा निधी जमवण्यासाठी त्यांनी अफलातून कल्पना जनतेसमोर मांडलीय. जनतेनं जास्तीत जास्त सिगारेट्स प्याव्यात जेणेकरून राज्याला जास्तीत जास्त महसूल गोळा करता येईल असं वादग्रस्त विधान ममतांनी केलंय.

चिट फंड घोटाळ्याप्रकरणी आपल्या सरकारचं समर्थन करत सिगारेटवरील १० टक्के कर लागू करण्याची घोषणा त्यांनी केलीय. यातून दीडशे कोटी रुपये जमा होणार असून उरलेली रक्कम इतर मार्गांनी उभी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.
चिट फंड घोटाळ्यातले धागेदोरे ममता बॅनर्जींच्या पक्षातल्या नेत्यांपर्यंत येऊन पोहचले आहेत. त्यामुळं त्यांचं सरकार अडचणीत सापडलेलं असल्याना त्यांच्या वक्तव्यानं नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.