चिंदबरम महाराष्ट्रातून जाणार राज्यसभेवर

माजी अर्थमंत्री आणि गृहमंत्री पी. चिदंबरम यांना काँग्रेसची राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.

Updated: May 28, 2016, 04:33 PM IST
चिंदबरम महाराष्ट्रातून जाणार राज्यसभेवर title=

नवी दिल्ली : माजी अर्थमंत्री आणि गृहमंत्री पी. चिदंबरम यांना काँग्रेसची राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. मुख्य म्हणजे चिदंबरम हे महाराष्ट्रातून काँग्रेसचे उमेदवार असतील. चिदंबरम यांच्याबरोबरच कपिल सिब्बल आणि जयराम रमेश यांनाही राज्यसभेसाठी काँग्रेसनं उमेदवारी जाहीर केली आहे. 

कपील सिब्बल यांना उत्तरप्रदेशातून तर जयराम रमेश हे कर्नाटकमधून काँग्रेसचे उमेदवार असतील. यांच्याबरोबरच ऑस्कर फर्नांडिस कर्नाटकमधून, अंबिका सोनी पंजाबमधून, छाया वर्मा छत्तीसगडमधून, विवेक तनखा मध्य प्रदेशमधून आणि प्रदीप तमता उत्तराखंडमधून काँग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार आहेत. 

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हा निर्णय घेतला आहे. चिदंबरम यांनी २०१४ ची लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. चिदंबरम यांच्याऐवजी त्यांचा मुलगा कार्ती चिंदबरम या निवडणुकीसाठी तामीळनाडूच्या सिवगंगा मतदारसंघातून उभे होते, पण त्यांचा पराभव झाला होता. 

महाराष्ट्रातून उमेदवारी मिळवण्यासाठी सुशीलकुमार शिंदे आणि भालचंद्र मुणगेकर यांनी प्रयत्न केले होते, पण त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही.