दुर्ग, छत्तीसगड : छत्तीसगढच्या एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. पत्नी शारीरिक संबंधांना विरोध करते या रागातून एका नराधमानं आपल्या दोन महिन्यांच्या चिमुरड्याला जमिनीत जिवंत पुरल्याची घटना उघडकीस आलीय.
छत्तीसगडच्या दुर्ग भागात ही घटना घडलीय. राकेश असं या नराधमाचं नाव आहे. रोज दारू पिणाऱ्या राकेशचा पत्नी सीमासोबत नेहमीच वाद होत होता.
दोन दिवसांपूर्वी असाच दारूच्या नशेत राकेश घरी आला आणि त्यानं पत्नीकडे शरीर-संबंधांची मागणी केली. तिनं विरोध केल्यानंतर तो मुलाला घेऊन बाहेर पडला तो थेट पहाटे चार वाजल्याच्या सुमारास घरी आला.
सीमानं मुलांबद्दल विचारल्यानंतर त्याला आपण गाडून टाकल्याचं राकेशनं सांगितलं. भेदरलेल्या सीमानं पोलिसांकडे धाव घेतली मात्र तोवर राकेश फरार झाला होता.