नवी दिल्ली : केंद्र सरकार लवकरच प्रसुती रजा वाढविण्याची शक्यता आहे. आता १२ आठवड्यावरून ही मुदत २६ आठवडे करण्याचा सरकारचा विचार आहे. या संदर्भात कामगार मंत्रालयाने गेल्या आठवड्यात ट्रेड युनिअन्स आणि कर्मचाऱ्याशी चर्चा केली.
या बैठकीत बनिफिट अॅक्ट, १९६१ सुधारीत विधेयकावर चर्चा झाली.
आता काय नियम आहे.
- सध्या एका वर्किंग वुमन १२ आठवड्यांची प्रसुती रजा असते. डिलेव्हरीसाठी सहा आठवड्यांची आणि आई झाल्यावर सहा आठवड्यांची रजा मंजूर होते.
मंत्रालय कायद्यात काही बदलाव करण्याचा विचार करीत आहे. त्यामुळे याचा फायदा मुले दत्तक घेणाऱ्या महिलांनाही होणार आहे.
- सरकार प्रसुती रजा आणि त्यावेळी देण्यात येणाऱ्या कॉम्पेन्सेशनवर चर्चा पूर्ण झाली आहे.
- आता गृहमंत्रालयाकडे या संदर्भात प्रस्ताव पाठविला आहे.
का वाढली जात आहे रजा?
- महिला आणि बाल कल्याण मंत्री मेनका गांधी यांनी प्रसुती रजा २८ आठवडे करण्याची शिफारस केली होती.
- यासाठी कामगार मंत्रालयाशी चर्चा केली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.