VIDEO : थोडक्यासाठी वाचले लालू, नाहीतर...!

बिहारमध्ये निवडणुकीच्या रणधुमाळीत व्यस्त असलेले लालू प्रसाद यादव आज थोडक्यासाठी बचावले.

Updated: Oct 16, 2015, 06:24 PM IST
VIDEO : थोडक्यासाठी वाचले लालू, नाहीतर...! title=

लखनऊ : बिहारमध्ये निवडणुकीच्या रणधुमाळीत व्यस्त असलेले लालू प्रसाद यादव आज थोडक्यासाठी बचावले.

त्याचं झालं असं की, बिहारच्या मोतिहारीमध्ये लालूंची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. पण, आयोजकांच्या ढिसाळ कारभारामुळे स्टेजच्या भागात वर लटकावण्यात आलेला पंखा मात्र व्यवस्थित फिट करण्यात आला नव्हता.

अधिक वाचा - स्टेज तुटले, थोडक्यात वाचवले लालू प्रसाद यादव

लोंबलेल्या या पंख्याकडे, लालू यादव यांनीही आयोजकांचं लक्ष वेधलं... पण, काही हालचाल करण्यापूर्वीच हा पंखा थेट खाली बसलेल्या लालूंच्या पायाजवळ पडला... आणि लालू थोडक्यात बचावले.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.