लेखकानं पुरस्कार केला परत; घरी पोलीस झाले दाखल

नको तिथे मूग गिळून गप्प बसणाऱ्या सरकारवरचा निषेध म्हणून साहित्यिकांनी आपले पुरस्कार परत करण्याचा सपाटाच लावलाय. यात चळवळीत प्रसिद्ध गुजराती लेखक गणेश देवी हेदेखील सामील झाले. त्यांनीही आपला पुरस्कार सरकारला साभार परत केला. परंतु, थोड्याच वेळात त्यांच्या दारात पोलीस येऊन धडकले. 

Updated: Oct 16, 2015, 05:02 PM IST
लेखकानं पुरस्कार केला परत; घरी पोलीस झाले दाखल  title=

अहमदाबाद : नको तिथे मूग गिळून गप्प बसणाऱ्या सरकारवरचा निषेध म्हणून साहित्यिकांनी आपले पुरस्कार परत करण्याचा सपाटाच लावलाय. यात चळवळीत प्रसिद्ध गुजराती लेखक गणेश देवी हेदेखील सामील झाले. त्यांनीही आपला पुरस्कार सरकारला साभार परत केला. परंतु, थोड्याच वेळात त्यांच्या दारात पोलीस येऊन धडकले. 

गृह मंत्रालयाच्या आदेशांवर लेखकाची चौकशी करण्यात येत असल्याचं पोलिसांचं म्हणणं होतं. लेखकांकडून सरकारविरुद्ध असंतोष जाहीर करण्यासाठी एखादी मोहीम सुरु करण्यात आलीय का? याची चौकशी पोलीस करत होते. 

गणेश यांनी रविवारी आपला पुरस्कार परत करण्याची घोषणा केली होती. 1993 साली त्यांच्या 'आफ्टर अॅम्नीजिया' या इंग्रजी पुस्तकाला मिळालेला साहित्य अकादमी पुरस्कार त्यांनी सरकारला परत करण्याची घोषणा केली होती. यानंतर दुसऱ्याच दिवशी एक महिला अधिकारी वडोदरास्थित त्यांच्या घरी दाखल झाली... आणि 'लेखकांचं हे संघटित आंदोलन आहे का? यामागे कुणाचा हात आहे?' असे अनेक प्रश्न विचारून गणेश यांना भंडावून सोडलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.