AIPMT RESULT 2015 : सीबीएसईचा 'प्री-मेडिकल टेस्ट'चा निकाल जाहीर

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात 'सीबीएसई'नं आज संपूर्ण भारतात मेडिकल आणि डेन्टल कोर्सेससाठी घेण्यात आलेल्या 'प्री-मेडिकल टेस्ट'चा (AIPMT)निकाल जाहीर केलाय.

Updated: Aug 17, 2015, 02:29 PM IST
AIPMT RESULT 2015 : सीबीएसईचा 'प्री-मेडिकल टेस्ट'चा निकाल जाहीर title=

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात 'सीबीएसई'नं आज संपूर्ण भारतात मेडिकल आणि डेन्टल कोर्सेससाठी घेण्यात आलेल्या 'प्री-मेडिकल टेस्ट'चा (AIPMT)निकाल जाहीर केलाय.

हा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी http://cbseresults.nic.in/aipmt/aipmt_2015.htm
या वेबसाईटवर जाऊ शकतात. 

यामध्ये, निकाल पाहण्यासाठी तुम्हाला तुमचा रोल नंबर आणि तुमचा जन्मतारीखेचा तपशील द्यावा लागेल. 

३ मे रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेत पेपर फुटल्यानं सुप्रीम कोर्टानं ही परीक्षा रद्द ठरवत पुन्हा परीक्षा घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर ही परिक्षा २५ रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी तब्बल ६,३२,६२५ विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.