राज विरोधात नालंदा कोर्टात केस

बिहारचे मुख्य सचिव जर महाराष्ट्र पोलिसांवर कारवाई करणार असतील तर महाराष्ट्रातील प्रत्येक बिहारीला घुसखोर म्हणून हाकलून देऊ असा आक्रमक पवित्रा घेणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात नालंदा येथील जिल्हा कोर्टात केस दाखल करण्यात आली आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Sep 3, 2012, 09:22 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
बिहारचे मुख्य सचिव जर महाराष्ट्र पोलिसांवर कारवाई करणार असतील तर महाराष्ट्रातील प्रत्येक बिहारीला घुसखोर म्हणून हाकलून देऊ असा आक्रमक पवित्रा घेणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात नालंदा येथील जिल्हा कोर्टात केस दाखल करण्यात आली आहे. एका सामाजिक कार्यकर्त्याने आयपीसीच्या विविध कलमांतर्गत राज ठाकरे यांच्याविरोध केस दाखल केली आहे.
सीतामढी जिल्ह्यातून अब्दुल कादिर याला अटक करण्यासाठी बिहारमध्ये गेलेल्या मुंबई पोलिसांवर बिहारच्या पोलिसांनी कारवाई केली तर बिहारमधून महाराष्ट्रात आलेल्या प्रत्येक बिहारीला घुसखोर ठरवून त्याला महाराष्ट्राबाहेर हकलण्यात येईल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. मुंबई येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
तसेच चुकीच्या पद्धतीने बातमी देणाऱ्या हिंदी चॅनल्सलाही राज ठाकरे यांनी इशारा दिला होता.
बिहारी नेत्यांवर बाळासाहेब कडाडले
बिहारी नेत्यांच्या विरोधात ठाकरे कुटुंबीय एकवटले आहेत. सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भूमिकेचे जोरदार समर्थन केलंय. तसंच बिहारी नेत्यांचा चांगलाच समाचार घेतलाय. दिग्विजय सिंग हे काँग्रेसमधील तमाशातील बिनपैशाचे नाचे असल्याची खरमरीत टीका केलीय.
बाळासाहेबांनी बिहारी नेत्यांचा समाचार घेताना म्हटले आहे की सध्या काही लोक विनाकारण बिहारचा नगारा वाजवत आहेत. त्यालमध्येय बिहारचे बिनकामाचे नेते असो किंवा काँग्रेसी तमाशात फुकटात नाचणारे नर्तक दिग्गीराजा. बिहारच्या पुढार्यांआनी तोंडाची डबडी वाजवू नयेत. नाहीतर ‘ठाकरे’ हे बिहारचे नसून अस्सल महाराष्ट्राचे व शिवरायांच्या रक्तामांसाचेच आहेत हे दाखवून द्यावे लागेल, असा इशारा बाळासाहेबांनी दिला आहे.
बिहारी नेते मुस्लिम व्होट बँकेवर डोळा ठेवूनच बडबड करत आहेत. नितीश कुमारांनी अशा फडतूस वादात पडू नये, असा सल्ला बाळासाहेबांनी दिला आहे. आझाद मैदानातील दंगलीचा गुन्हेगार अब्दुल कादीर बिहारमध्येच का लपला? बिहार हे देखील याच देशातील राज्य आहे ना? मग तेथून आतंकवादी पकडून आणायला सीमावाद का निर्माण होतो? असा खडा सवालही त्यांनी विचारला आहे.