www.24taas.com, झी मीडिया, गाजियाबाद
उत्तर प्रदेशमधील गाजियाबाद येथे वाहन चोरी करणाऱ्या गँगला पकडण्यात पोलिसांना यश आलंय. गर्लफ्रेंडला फोन करणे या गँगला भारी पडलंय. या गँगनं एक कार चोरी केली होती. त्या कारमध्ये मालकांचा मोबाईल फोन राहिला होता. त्या फोनवरुन गँगमधील एका चोराने त्याच्या गर्लफ्रेंडला फोन केला होता. त्या एका फोनवरुन पोलिसांनी मोबाईल फोन ट्रेस करुन गँगचा शोध लावला.
आतापर्यंत या गँगनी 100 हून जास्त वाहनांची चोरी केली असून सध्या पोलिसांनी त्या गँगकडून 6 कार आणि तीन बाईक्स जप्त केल्या आहेत. गाजियाबाद शहराचे एसपी शिव हरी मिणा यांनी सांगितले की, ‘या गँगपैकी एका सदस्याने कारमध्ये राहिलेल्या मोबाईलवरुन आपल्या गर्लफ्रेंडला फोन केला होता. तो फोन पोलिसांनी ट्रेस करुन चोरांना पकडले.’
गँग खूप हुशार होती की, घरांबाहेर असलेली वाहने काही मिनिटांतच चोरी करायचे आणि त्याची माहिती घरात असलेल्या लोकांना कळतही नसे. नंतर चोरी केलेली कार आणि बाईक्स मॉल्सजवळ पार्क करायचे, जेणेकरुन कोणाला संशय येणार नाही. त्यानंतर काही दिवसांनी वातावरण शांत झाल्यावर वाहन विकून टाकत असे. ही गँग आपल्यासोबत हत्यार आणि चाकू ठेवत असत जे आता पोलिसांनी जप्त केले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.